EPFO च्या PM-VBRY थेट लाभ हस्तांतरण सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती
युवकांच्या सक्षमीकरणासाठी आणि ‘विकसित भारत’च्या निर्मितीसाठी एक ऐतिहासिक पाऊल!
केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना’ (EPFO) ठाणे दक्षिण घाटकोपर कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ (PM-VBRY) अंतर्गत थेट लाभ हस्तांतरण (Incentive Disbursement) सोहळ्यात आज मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिलो.घाटकोपर (पूर्व), एम. जी. रोड येथील ‘रामजी असर विद्यालय’च्या कम्युनिटी हॉलमध्ये हा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमादरम्यान नवी दिल्लीहून आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते देशभरातील लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरित करण्यात आले, ज्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) आम्ही सर्व उपस्थितांनी एकत्र पाहिले. ‘रोजगार व करोबार, साथ है भारत सरकार’ या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत ही योजना आपल्या तरुणांना आणि उद्योजकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल.घाटकोपरमधील लाभार्थी आणि सर्व नागरिकांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली!









