महापौर रितूताई तावडेंच्या उपस्थितीत ‘टिळकमार्ग शालेय इमारती’चा लोकार्पण सोहळा
बृहन्मुंबई महानगरपालिका ‘एन’ विभागांतर्गत घाटकोपर (पूर्व) येथील ‘टिळकमार्ग शालेय इमारत संकुलाचा’ भव्य लोकार्पण सोहळा मुंबईच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे आणि माझ्या प्रमुख उपस्थितीत आज उत्साहात पार पडला.या प्रसंगी नगरसेविका श्रीमती राखी जाधव, नगरसेविका श्रीमती अर्चना भालेराव, नगरसेवक श्री. धर्मेश गिरी, शिक्षण समिती सदस्य श्रीमती योजना ठोकळे, उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी श्रीमती सुजाता खरे, उपशिक्षणाधिकारी (पूर्व उपनगरे) श्रीमती सायली सुर्वे, एन विभागाचे सहायक आयुक्त श्री. जयदीप मोरे तसेच इतर मान्यवर, विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जी+६ (तळमजला अधिक सहा मजले) मजल्यांच्या या अत्याधुनिक इमारतीत संगणक, विज्ञान, खगोलशास्त्र, सायकॉलॉजिकल थेरपी लॅब आणि व्हर्च्युअल क्लासरूम्स अशा जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आपल्या परिसरातील कामराज नगर, रमाबाई नगर, छेडा नगर, विक्रोळी, चेंबूर आणि आसपासच्या अनेक भागांतील ७८९ विद्यार्थ्यांना आता एकाच छताखाली गुणवत्तापूर्ण व सुरक्षित शिक्षण मिळणार आहे. सर्व बालमित्रांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!










