पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी: घाटकोपर पूर्व येथील कामांचा घेतला आढावा
पावसाळ्यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज! घाटकोपरमध्ये नालेसफाई कामांचा प्रत्यक्ष आढावा… पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी आणि शहराला पूरमुक्त ठेवण्याच्या दृष्टीने आज घाटकोपर पूर्व भागातील विविध नाल्यांच्या सफाई कामाची प्रत्यक्ष पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला. या दौऱ्यात मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा जी, मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार श्री. अमीत साटम जी, आमदार श्री. मिहीर कोटेचा जी, नगरसेविका राखीताई जाधव, एन विभाग प्रभाग समिती अध्यक्षा अश्विनी मते, नगरसेविका श्रीमती अर्चना भालेराव, नगरसेवक श्री. प्रवीण छेड्डा, मा. नगरसेवक श्री. भालचंद्र शिरसाट आणि मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या विशेष पाहणी दौऱ्यात सकाळी १० वाजता लक्ष्मीबाग नाला (बेस्ट डेपो जवळ) आणि १०.३० वाजता सोमय्या नाला (रायझिंग सिटी) येथे जाऊन गाळ उपसण्याच्या कामाची सद्यस्थिती तपासली. पावसाळ्यापूर्वी ही कामे दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत या दृष्टीने प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर आढावा घेतला. यावेळी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या कडक सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. जनहितासाठी आमचे हे प्रयत्न पावसाळ्यापर्यंत असेच सातत्याने सुरू राहतील.











