‘पालकमंत्री प्रवास’ दौरा: घाटकोपर पूर्व क्षेत्रातील प्रश्नांवर अ‍ॅड. आशिष शेलार यांच्याशी चर्चा

Posted by admin
Category:

आज घाटकोपर येथील ईशान्य मुंबई भाजप जिल्हा कार्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री व मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मा. अ‍ॅड. आशिष शेलार जी हे ‘पालकमंत्री प्रवास’ दौऱ्यानिमित्त विभागातील समस्या जाणून घेण्यासाठी आले होते. या महत्त्वपूर्ण प्रसंगी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन घाटकोपर पूर्व क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या नागरी प्रश्नांवर आणि दीर्घकालीन समस्यांवर तोडगा काढण्यासाठी त्यांना सविस्तर निवेदन दिले, तसेच घाटकोपरच्या स्थानिक समस्या देखील त्यांच्यासमोर प्रामुख्याने मांडल्या.या बैठकीत मुंबईच्या महापौर माननीय श्रीमती रितूताई तावडे, भाजप ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष तथा या दौऱ्याचे संयोजक श्री. दीपक दळवी जी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाजप परिवारातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.पालकमंत्री महोदयांनी सर्व मागण्या आणि समस्या अत्यंत सकारात्मकतेने ऐकून घेतल्या असून, त्यावर तातडीने आणि ठोस कायदेशीर तोडगा काढण्याचे आश्वासन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिले आहे. घाटकोपरकरांच्या सुखासाठी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने कटिबद्ध आहोत!

Leave a Reply

Open chat
Powered by