वॉर्ड १३२ मधील उद्याने, मैदाने सुशोभीकरण व नागरी सुविधांबाबत ‘एन’ विभाग कार्यालयात आढावा बैठक

Posted by admin
Category:

आज दिनांक १८ मे २०२६ रोजी, घाटकोपर पूर्व मधील वॉर्ड क्रमांक १३२ मधील विविध उद्याने आणि मोकळ्या मैदानांचे सुशोभीकरण, तसेच तेथील मूलभूत नागरी सुविधांचा दर्जा सुधारण्याबाबत माझ्या मार्गदर्शनाखाली ‘एन’ विभाग कार्यालयात एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.या बैठकीला मुंबईच्या माननीय महापौर श्रीमती रितूताई तावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. वॉर्ड १३२ मधील हरित क्षेत्राचा विकास करणे, नागरिकांसाठी चालण्याचे ट्रॅक, लहान मुलांची खेळणी आणि मैदानांची दुरूस्ती, जेष्ठ नागरिकांसाठी स्वछतागृह यावर सविस्तर चर्चा झाली.याप्रसंगी महानगरपालिका उपायुक्त श्री. संतोष धोंडे जी, उपायुक्त श्री. अजितकुमार अंबी जी, सहाय्यक आयुक्त (वॉर्ड ऑफिसर) श्री. मारुती पवार जी, यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष श्री विकास कामत जी,श्री. विनायक कामत जी, श्री. विशाल पूज जी, श्री. दिलीप लिलानी जी, श्री. अनुज शाह जी, श्री. ध्रुव अजमेरा आणि श्री. हेमंत ठक्कर, तसेच स्थानिक नागरिक व जेष्ठ नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.घाटकोपरमधील नागरिकांना उत्तम नागरी सुविधा आणि प्रदूषणमुक्त, सुंदर परिसर उपलब्ध करून देणे ही आमची कटिबद्धता आहे.

Leave a Reply

Open chat
Powered by