बृहन्मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर घाटकोपरमध्ये भाजपचा मेळावा
घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघात, येणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष मुंबईच्या वतीने बूथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख मेळावा आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस भाजपा मुंबईचे अध्यक्ष, आमदार मा. श्री. अमीत साटम जी यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांसाठीची रणनीती, संघटन बळकटीकरण आणि मतदारांशी थेट संवाद यावर सविस्तर चर्चा केली.बैठकीदरम्यान सर्व कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करून पारदर्शक, जबाबदार आणि विकासाभिमुख मुंबईची पुनर्निर्मिती करण्याचा ठाम संकल्प व्यक्त केला. ‘मुंबईकरांचा आवाज’ बनून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा आणि महायुतीचे शासन पुन्हा स्थापन करण्याचा निर्धार सर्वांनी एकमताने व्यक्त केला.या प्रसंगी माझ्यासह जिल्हाध्यक्ष श्री. दीपक दळवी, जिल्हा महामंत्री श्री. भावेश भानुशाली, श्री. लाल यादव,जिल्हा उपाध्यक्ष श्री. विकास कामत, श्री रवी पूज माजी नगरसेवक श्री. भालचंद्र शिरसाट, श्री प्रवीण छेडा,श्रीमती बिंदू त्रिवेदी,श्रीमती ऋतु तावडे, श्रीमती फाल्गुनी दवे तसेच मंडळ अध्यक्ष श्री विशाल पूज, श्री रचित त्रिवेदी,श्रीमती अर्पिता शेलार आणि सर्व वॉर्ड अध्यक्ष, महामंत्री, सन्माननीय आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उत्साहाने उपस्थित होते.ही बैठक म्हणजे घाटकोपर पूर्वेतून नव्या उत्साहाचा, एकतेचा आणि विजयाचा शंखनाद होता.












