वन महोत्सव २०२६: २५,००० मोफत रोपांचे वाटप व प्रदर्शन

Posted by admin
Category:

पर्यावरण संवर्धनासाठी एक सकारात्मक पाऊल…

श्री दुर्गा परमेश्वरी सेवा मंडळ (रजि.) व भारतीय जनता पार्टी (घाटकोपर पूर्व – वॉर्ड क्र. १३१) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “वन महोत्सव २०२६” अंतर्गत भव्य रोपवाटिका प्रदर्शन व २५,००० मोफत रोपांच्या वाटप उपक्रमाला उपस्थित राहून आयोजकांचे मनापासून अभिनंदन केले.माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या “एक पेड माँ के नाम” या संकल्पनेने प्रेरित होऊन आयोजित या उपक्रमात नागरिकांना ग्लोबल वॉर्मिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, औषधी वनस्पती, गांडूळखत आणि बाल्कनी गार्डनिंग यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांकडून अत्यंत मोलाचे मार्गदर्शन मिळाले.हवामान बदलाच्या या काळात पर्यावरण संरक्षणासाठी अशा स्तुत्य उपक्रमांची अत्यंत गरज आहे. या उत्कृष्ट उपक्रमाच्या संकल्पक नगरसेविका राखी जाधव जी आणि सर्व आयोजकांचे मी मनःपूर्वक कौतुक करतो.कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार श्री. अमीत साटम जी यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी भाजपा मुंबई महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी जी, नगरसेवक धर्मेश गिरी जी, माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट जी यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पर्यावरण रक्षणाचा हा संदेश घरोघरी पोहोचवून चला आपण सर्व मिळून एक हिरवीगार आणि समृद्ध मुंबई घडवूया!

Leave a Reply

Open chat
Powered by