५७व्या वाढदिवसानिमित्त घाटकोपरमध्ये भव्य सेवा सन्मान सोहळा
रविवार, १६ ऑगस्ट २०२६राष्ट्रसंत परमपूज्य श्री नम्रमुनी महाराज साहेब यांच्या पावन सान्निध्यात आणि मंगल आशीर्वादाने, घाटकोपर जनसंकल्प समितीच्या वतीने माझ्या ५७व्या वाढदिवसानिमित्त आयोजित “सेवा सन्मान सोहळा” अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात पार पडला.या सोहळ्यातील सर्वात भावस्पर्शी क्षण ठरलेली माझी “रजत तुला” हा केवळ माझा वाढदिवसाचा सन्मान नसून, घाटकोपर पूर्व येथील हिंदू स्मशानभूमीचा कायापालट, मूक प्राण्यांसाठी वैद्यकीय उपचार सुविधा आणि विविध सेवाभावी उपक्रमांसाठी निधी उभारण्याचा एक पवित्र संकल्प ठरला आहे. या सेवायज्ञात सढळ हस्ते योगदान देणाऱ्या सर्व दानशूर नागरिक, उद्योजक आणि संस्थांचा मी मनःपूर्वक आभारी आहे.परमपूज्य गुरुदेवांच्या अमृतमयी वाणीने आणि आशीर्वादाने आम्हा सर्वांना समाजसेवेची नवी ऊर्जा मिळाली. तसेच सुप्रसिद्ध लोकगायक श्री. कीर्तिदानभाई गढवी यांच्या लोकडायऱ्याने या सोहळ्यात अधिक रंगत आणली. हा सोहळा माझ्यासाठी अत्यंत स्मरणीय असून घाटकोपरकरांच्या सेवेसाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.











