मुंबईच्या महापौर रितूताई तावडे यांच्यासह घाटकोपर पूर्व भागातील पूरपरिस्थितीची पाहणी

Posted by admin
Category:

आज दिनांक ३ जुलै २०२६ रोजी मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीची त्वरित दखल घेत, तसेच भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये या उद्देशाने, मी मुंबईच्या महापौर रितू ताई तावडे यांच्या समवेत घाटकोपर पूर्व परिसरातील विविध भागांची महापालिका अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली.या पाहणी दौऱ्यादरम्यान पाणी साचणारे संवेदनशील भाग, नाले सफाई आणि जलनिस्सारण व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांना पावसाळ्यात कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवण्याच्या कडक सूचना संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.या प्रसंगी नगरसेवक धर्मेश गिरी, विनायक कामत, विकास कामत, विशाल पुज, दिलीप लिलानी, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Open chat
Powered by