मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना “आत्मा आराध्या चातुर्मास २०२६” चे सस्नेह निमंत्रण

Posted by admin
Category:

घाटकोपरच्या पावन भूमीत राष्ट्रसंत परमपूज्य श्री नम्रमुनी महाराज साहेब यांच्या पावन सान्निध्यात आयोजित “आत्मा आराध्या चातुर्मास २०२६” या भव्य धार्मिक, सामाजिक व मानवसेवेच्या महोत्सवाचे निमंत्रण महाराष्ट्राचे विकासपुरुष, लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीसजी यांना सस्नेह प्रदान केले.याप्रसंगी मुंबईच्या महापौर सौ. रितूताई तावडे, नगरसेविका राखीताई जाधव तसेच नगरसेवक धर्मेश गिरी, श्री. मूलराजभाई छेडा,श्री. जयेशभाई सेठ उपस्थित होते.धर्म, अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेचा संगम असलेल्या या पावन सोहळ्यास मान्यवरांची लाभलेली उपस्थिती निश्चितच या महोत्सवाची शोभा अधिक वृद्धिंगत करणारी ठरणार आहे.

Leave a Reply

Open chat
Powered by