घाटकोपर: श्री दुर्गापरमेश्वरी मंदिर वार्षिक उत्सवानिमित्त महाप्रसाद सोहळ्यात उपस्थिती व दर्शन
4
May
॥ जय माता दी ॥
काल दि. ०३ मे २०२६ रोजी माझ्या मतदारसंघातील श्री दुर्गापरमेश्वरी मंदिर वार्षिक उत्सव २०२६ निमित्त आयोजित महाप्रसाद (भंडारा) सोहळ्यात उपस्थित राहून देवीचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले.विशेष म्हणजे, नगरसेविका राखीताई जाधव यांच्या विशेष पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली हा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. याप्रसंगी माझ्यासह नगरसेवक श्री. धर्मेश गिरी जी देखील उपस्थित होते. हा भव्य भक्ती सोहळा यशस्वी करणाऱ्या सर्व आयोजकांचे आणि स्वयंसेवकांचे मनापासून अभिनंदन!आई दुर्गापरमेश्वरी चा आशीर्वाद आपल्या सर्वावर सदैव राहो.






