घाटकोपर पूर्व: मान्सून पूर्वतयारीचा आढावा
24
Jun
घाटकोपरकरांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर!मुंबईत पावसाचे आगमन झाले असून, या मान्सूनमध्ये घाटकोपर पूर्व मतदारसंघातील नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आम्ही पूर्णपणे खबरदारी घेत आहोत. माझ्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे यांनी ‘एन’ वॉर्डच्या पालिका अधिकाऱ्यांसोबत विशेष आढावा बैठक घेतली.पाणी साचण्याची संभाव्य ठिकाणे, ड्रेनेज व्यवस्था आणि रस्त्यांची सुरक्षा यावर तत्परतेने मार्ग काढण्याचे कडक आदेश पालिका यंत्रणेला देण्यात आले आहेत. या बैठकीस भाजपा पदाधिकारी दिलीप लिलानी, ध्रुव अजमेरा, हेमंत ठक्कर, देवेन चितलिया, कैलास करकेरा आणि उमेश वर्मा उपस्थित होते. “घाटकोपरकरांची सुरक्षितता हेच आमचे मुख्य ध्येय आहे. पालिकेची संपूर्ण यंत्रणा आणि आम्ही लोकप्रतिनिधी तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत!”






