घाटकोपर पूर्व भाजप कार्यालयात ‘जनता दरबार’

Posted by admin
Category:

नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी घाटकोपर (पूर्व) येथील भाजपा कार्यालयात आज ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला. या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.’जनता दरबार’ हा जनतेचा दरबार असून, नागरिकांना त्यांच्या स्थानिक समस्या मांडण्यासाठीचे हे हक्काचे व्यासपीठ आहे.नागरिकांनी व्यक्त केलेल्या प्रत्येक प्रश्नाचा गांभीर्याने विचार करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही तातडीच्या तक्रारींवर तत्काळ कारवाईही करण्यात आली, ज्यामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान आणि विश्वास व्यक्त केला.जनतेच्या प्रश्नांना उत्तर देणे, त्यांच्या समस्या दूर करणे आणि घाटकोपरच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलणे, हाच माझा संकल्प आहे.जनतेसोबत, जनतेसाठी हीच माझी काम करण्याची दिशा आणि प्रेरणा आहे.

Leave a Reply

Open chat
Powered by