घाटकोपर पूर्व: भव्य जनसहभागात ‘जागतिक योग दिन २०२६’ उत्साहात साजरा

Posted by admin
Category:

“योगातून आरोग्य, आरोग्यातून आत्मविश्वास आणि आत्मविश्वासातून राष्ट्रनिर्मिती” या मुख्य विचाराला साकार करत, ‘जागतिक योग दिन २०२६’ संपूर्ण घाटकोपर (पूर्व) विधानसभा क्षेत्रात अत्यंत उत्साह, ऊर्जा आणि अभूतपूर्व जनसहभागाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. “योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे, तर शरीर, मन आणि आत्म्याला जोडणारी भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी आहे” याच भावनेने, माझ्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील विविध वॉर्डांमध्ये भव्य योग शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजारो नागरिक, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निरोगी जीवनाचा संकल्प केला.या उपक्रमांतर्गत वॉर्ड क्र. १३१ मध्ये नगरसेविका राखीताई जाधव यांच्या सहकार्याने आणि रचित त्रिवेदी, सचिन भोसले, महिला मोर्चाच्या अनुताई खत्री व गीता जाधव यांच्या पुढाकारातून जनरल अरुणकुमार वैद्य मैदान येथे; वॉर्ड क्र. १३२ मध्ये महापौर श्रीमती रितू तावडे जी यांच्या सहकार्याने विशाल पूज, अनुज शाह, दिलीप लिलानी व नीलम गोलेचा यांनी ९० फूट रोड येथे; वॉर्ड क्र. १३३ मध्ये अर्पिता शेलार व कुणाल देवेंद्र यांनी एम.एम.आर.डी. मैदान येथे; वॉर्ड क्र. १३० मध्ये नगरसेवक धर्मेश गिरी, राजू बर्गे, शैलेश मेहता, सागर वाघमारे व अनिता दोशी यांच्या नियोजनातून स्कायलाईन ओयासिस येथे, तर वॉर्ड क्र. १२५ मध्ये संघदीप केदारे, राणा सिंग व सविताताई कापसे यांनी गंधकुटी बुद्ध विहार येथे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने योग शिबिरे पार पाडली.या सर्व मुख्य केंद्रांवर जिल्हा महामंत्री भावेश भानुशाली, विकास कामत, अशोक राय, विद्युत काजी, संजय दरेकर, तुषार कांबळे आणि अनिता अतितकर या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सर्व कार्यकर्त्यांचा आणि स्थानिक योगप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या खंबीर नेतृत्वामुळेच आज भारतीय संस्कृतीचा हा अमूल्य वारसा जागतिक स्तरावर पोहोचला असून, संपूर्ण जग आज या योगविद्येचा स्वीकार करत आहे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. योगाच्या माध्यमातून आरोग्य, सकारात्मकता आणि आत्मविश्वासाचा हा प्रेरणादायी संदेश घाटकोपरच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून हे शिबिर यशस्वी करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे व नागरिकांचे मनःपूर्वक आभार!

Leave a Reply

Open chat
Powered by