घाटकोपर: पंतनगर येथील नूतनीकरण केलेल्या उद्यानाचा भव्य लोकार्पण सोहळा

Posted by admin
Category:

आज दिनांक घाटकोपर (पूर्व) येथील पंतनगर परिसरातील सुंदररित्या नूतनीकरण करण्यात आलेल्या गार्डनच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिलो. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छ, हरित आणि आनंददायी वातावरण लाभणार असून, मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी हे ठिकाण एक उत्तम विरंगुळ्याचे केंद्र ठरेल.या उपक्रमासाठी पुढाकार घेतलेल्या Jade Gardens – Associations of Societies तसेच सर्व सहकार्य करणाऱ्या संस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.या प्रसंगी माझ्यासोबत नगरसेविका राखीताई जाधव, माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट जी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानीय नागरिक उपस्थित होते. अशा विकासकामांच्या माध्यमातून आपल्या परिसराचा दर्जा उंचावण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.

Leave a Reply

Open chat
Powered by