गणेश नगर-लक्ष्मी नगर SRA प्रकल्पाला गती देण्याबाबत स्थानिक नागरिकांशी संवाद

Posted by admin
Category:

आज दिनांक ४ जुलै २०२६ रोजी गणेश नगर–लक्ष्मी नगर, घाटकोपर पूर्व येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (SRA) गेली अनेक वर्षे रखडल्यामुळे येथील रहिवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या प्रकल्पाला गती मिळून गणेश नगरमधील प्रत्येक पात्र नागरिकाला लवकरात लवकर हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने नगरसेविका राखीताई जाधव यांच्यासह स्थानिक नागरिकांशी सविस्तर संवाद साधला.यावेळी नागरिकांच्या समस्या व सूचना जाणून घेत, परस्पर सामंजस्य आणि सर्वानुमते हा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प तातडीने सुरू करण्याची भूमिका मांडली. तसेच नागरिकांच्या सहकार्याने हा प्रकल्प यशस्वीपणे मार्गी लावून प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित व हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासनही दिले.

Leave a Reply

Open chat
Powered by