आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या सेरेना म्हास्करचा गौरव
30
Oct
कर्तृत्ववान सुपुत्रीचा गौरव!
2025 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या कबड्डी स्पर्धेत कुमारी सेरेना म्हास्कर हिने भारताचे प्रतिनिधित्व करताना सुवर्ण पदक पटकावले आणि संपूर्ण देशाचा व विशेषतः महाराष्ट्राचा गौरव वाढवला. काल माझ्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला. तिच्या कठोर परिश्रम, निष्ठा आणि जिद्दीला सलाम करत तिच्या यशाचा गौरव करताना मन:पूर्वक आनंद झाला. सेरेना ही आजच्या पिढीतील युवक-युवतींसाठी प्रेरणास्थान ठरावी. तिच्या पुढील वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा!जय हिंद





