श्री काठियावाड स्थानकवासी जैन समाजातर्फे आयोजित नोटबुक वाटप कार्यक्रम संपन्न
14
Jun
आज दिनांक १४ जून २०२६ रोजी श्री काठीयावाड स्थानकवासी जैन समाज, घाटकोपर यांच्या वतीने आयोजित नोटबुक वाटप कार्यक्रमास उपस्थित राहिलो. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम असून, यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात नवी ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास आहे. या प्रसंगी माझ्यासोबत नगरसेविका राखीताई जाधव देखील उपस्थित होत्या.अशा सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडत असून, अशा कार्यासाठी मी सदैव पाठिंबा देत राहीन.





