वाढदिवसाचे औचित्य साधून ३०० गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

Posted by admin
Category:

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना सायकलची नवी गती!घाटकोपर पूर्व परिसरातील गरजू शालेय विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ व्हावा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याला नवी गती मिळावी, या सेवाभावी उद्देशाने राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून अर्हम युवा सेवा ग्रुपच्या सौजन्याने ३०० शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप उपक्रम आज उत्साहात पार पडला.या सोहळ्यास परम गुरुदेव श्री नम्रमुनीजी महाराज यांच्या पावन उपस्थितीसह महापौर श्रीमती रितू तावडे, नगरसेविका श्रीमती राखी जाधव, नगरसेवक श्री. धर्मेश गिरी आणि माजी नगरसेवक श्री. भालचंद्र शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.शिक्षणाची नवी वाट चालणाऱ्या आमच्या बालमित्रांना भावी प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा!

Leave a Reply

Open chat
Powered by