राष्ट्रसंत नम्रमुनी महाराजांच्या प्रेरणेने मोफत पशुवैद्यकीय उपचार केंद्र सुरू

Posted by admin
Category:

मुक्या प्राण्यांच्या आरोग्यासाठी एक समर्पित पाऊल!

राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री. नम्रमुनी महाराज साहेब यांच्या पावन प्रेरणेने आणि माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून घाटकोपर (पूर्व) येथे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पशु आरोग्य भवन – अर्हम् अलवेज केअर’ या मोफत पशुवैद्यकीय उपचार केंद्र व प्राणी रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.या सेवाभावी उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री. नम्रमुनी जी महाराज साहेब यांचे मंगल आशीर्वाद लाभले. याप्रसंगी मुंबईच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे, नगरसेविका श्रीमती राखीताई जाधव, नगरसेवक श्री. धर्मेश गिरी, माजी नगरसेवक श्री. भालचंद्र शिरसाठ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्राण्यांसाठी मोफत उपचार, तपासणी, लसीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेले हे केंद्र सर्व मुक्या जीवांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असेल.

Leave a Reply

Open chat
Powered by