मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘कर्करोग तपासणी महाअभियान’ मध्ये सहभाग
महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते, मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा, घाटकोपर पूर्व विधानसभा (वॉर्ड क्र. १३३) वॉर्डातर्फे बहीण लाडकी मुख्यमंत्र्यांची… घेऊ काळजी तिच्या आरोग्याची संकल्पनेंतर्गत आयोजित ‘कर्करोग तपासणी महाअभियानात’ प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभाग घेतला.स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नियोजनातून पार पडलेल्या या शिबिरात ३० वर्षांवरील महिलांसाठी स्तनाच्या कर्करोगाची मोफत प्राथमिक तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य व उपचारांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. परिसरातील महिलांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.याप्रसंगी रत्नम देवेंद्र, कुणाल रत्नम देवेंद्र, अर्पिता शेलार, मंगला पवार, कुंदा चक्रनारायण, शिव्या राय, फरझाना सलमानी, सुलोचना म्हात्रे, तनुजा शिरसाट, विजया संगम, सरिता जयस्वाल, मीना नानावरे, माधुरी यादव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.महिला आरोग्यासाठीचा हा उपक्रम यशस्वी करणाऱ्या सर्व डॉक्टर, आरोग्यसेवक व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!





