भाजपा जनसंपर्क कार्यालयात “मन की बात” (१३५ वी आवृत्ती) कार्यक्रमाचे आयोजन

Posted by admin
Category:

आज, रविवार दिनांक २८ जून २०२६ रोजी भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या १३५ व्या “मन की बात” कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण केले. यासोबतच घाटकोपर येथील विविध ठिकाणीसुद्धा हा कार्यक्रम नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे ऐकला.याप्रसंगी मुंबईच्या सन्माननीय महापौर श्रीमती रितूताई तावडे जी, नगरसेवक श्री. धर्मेश गिरी जी, जिल्हा उपाध्यक्ष विकास कामत जी, मंडळ महामंत्री दिलीप लिलानी जी व विद्युत काजी जी, वॉर्ड अध्यक्ष अनुज शाह यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व आदरणीय पदाधिकारी, निष्ठावंत कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाद्वारे आदरणीय पंतप्रधानांनी मांडलेल्या प्रेरणादायी विचारांचा आणि राष्ट्रहिताच्या विविध नाविन्यपूर्ण विषयांचा आम्हा सर्वांना एकत्रितपणे लाभ घेता आला. हा संवाद नेहमीच आम्हा सर्वांना देशसेवेसाठी नवी ऊर्जा देणारा ठरतो!

Leave a Reply

Open chat
Powered by