पंतनगर मनपा मराठी शाळा वाचवण्यासाठी घाटकोपरमध्ये तीव्र जनआक्रोश आंदोलन

Posted by admin
Category:

घाटकोपर पूर्व येथील पंतनगर मनपा मराठी शाळा क्र. २ ची सार्वजनिक जागा ‘निर्मल एज्युकेशन सोसायटी’ या खाजगी संस्थेला देण्याच्या निर्णयाविरोधात काल स्थानिक नागरिकांच्या सोबतीने आम्ही तीव्र जनआक्रोश आंदोलन केले. माझ्या मार्गदर्शनाखाली आणि वॉर्ड क्र. १३१ च्या नगरसेविका राखीताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनातून आम्ही प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत पालिकेची जागा खाजगी संस्थेच्या घशात घालू दिली जाणार नाही. या जागेचा वापर स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ‘CBSE शाळा/ज्युनिअर कॉलेज’ उभारण्यासाठीच व्हावा, तसेच येथे ‘अग्निशमन केंद्र’ आणि ‘आधुनिक सुविधा केंद्र’ सुरू करण्यात यावे, ही आमची ठाम मागणी आहे.काल पार पडलेल्या या आंदोलनात माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष विकास कामत, रचित त्रिवेदी, संजय (बाबू) दरेकर, तुषार कांबळे, सचिन भोसले, कुणाल रत्नम, महिला पदाधिकारी अनुताई खत्री, गीताताई जाधव, अनिताताई अतितकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि घाटकोपरचे सजग नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जनतेच्या हक्काचे संरक्षण होईपर्यंत आणि प्रशासनाला हा निर्णय मागे घ्यायला लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही

Leave a Reply

Open chat
Powered by