नौरोजी लाईन परिसरात महायुतीच्या विजयाची जोरदार नांदी! जनसंवाद आणि भव्य प्रचारसभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
10
Jan
वॉर्ड क्र. १३० मधील भाजपा– शिवसेना– आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. धर्मेश गिरी यांच्या प्रचारार्थ आज घाटकोपर (पश्चिम) येथील नौरोजी लाईन परिसरात भव्य प्रचारसभा व जनसंवाद कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी प्रेम आशीष तसेच प्रेम कुंज आणि प्रेम कांकू इमारतींमधील मैदानात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जनतेशी थेट संवाद साधत विकास, सुरक्षितता आणि प्रभागाच्या प्रगतीबाबत सविस्तर चर्चा झाली.
जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता, वॉर्ड क्र. १३० मध्ये महायुतीचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास वाटतो🚩







