झवेरबेन पोपटलाल सभागृहात ‘भजन जॅमिंग’ सोहळा उत्साहात संपन्न

Posted by admin
Category:

दि. १४ जून २०२६ रोजी घाटकोपर येथील झवेरबेन पोपटलाल सभागृहात विद्या छेडा आणि रिचा गाला यांच्या वतीने आयोजित ‘भजन जॅमिंग’ (Dhun of Dharam) या अत्यंत सुंदर आणि भक्तीमय कार्यक्रमात सहभागी झालो. पारंपारिक भजनांना आधुनिक संगीताची जोड देऊन सादर केलेल्या या मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरांनी मनाला एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा दिली. या मंगलमयी प्रसंगी माझ्यासोबत मुंबईच्या महापौर मा. श्रीमती रितूताई तावडे, नगरसेविका सौ. राखी जाधव जी आणि नगरसेवक श्री. धर्मेश गिरी जी प्रामुख्याने उपस्थित होते. जुन्या भक्ती परंपरेला नव्या पिढीच्या आवडीनुसार सादर करण्याची आयोजकांची ही संकल्पना खरोखरच कौतुकास्पद आणि अभिनव होती.एवढ्या सुंदर, दिव्य आणि भक्तीमय संध्याकाळाचे अत्यंत नेटके व भव्य आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply

Open chat
Powered by