घाटकोपर पूर्व: नागरी व मूलभूत सोयी-सुविधांबाबत ‘एन’ विभाग कार्यालयात आढावा बैठक

Posted by admin
Category:

घाटकोपर पूर्व ‘एन’ विभागातील नागरिकांच्या विविध नागरी व मूलभूत सुविधांच्या प्रश्नांबाबत आज महानगरपालिका ‘एन’ विभाग कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. उपायुक्त श्री. संतोष धोंडे, सहाय्यक आयुक्त श्री. मारुती पवार तसेच संबंधित विभागातील सर्व अधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा करत अनधिकृत फेरीवाले, विद्याविहार पश्चिम व घाटकोपरमधील अपुरा पाणीपुरवठा, पंतनगर येथील ड्रेनेज लाईन, वाढती वाहतूक कोंडी, नालेसफाई तसेच कामराज नगर येथील भुयारी मार्ग, घाटकोपर पुर्व मध्ये स्वतंत्र अग्निशमन केंद्र यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल आढावा घेण्यात आला. या सर्व प्रश्नांवर लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. घाटकोपर पूर्वकरांना उत्तम सुविधा देणे हीच आपली बांधिलकी असून त्यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधत काम सुरूच राहील. या बैठकीस नगरसेविका श्रीमती राखीताई जाधव, नगरसेविका कु. निर्मितीताई कानडे, नगरसेवक श्री. सुरेश आवळे, श्री. धर्मेश गिरी, स्वीकृत नगरसेवक श्री. प्रवीण छेडा तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. विकास कामत व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Open chat
Powered by