SRA समस्या थेट जागेवर सोडवण्यासाठी पंतनगरमध्ये ‘विशेष निवारण शिबिर’ संपन्न
मुंबईत प्रथमच झोपडपट्टी पुनर्वसनाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा जागेवरच निपटारा करण्यासाठी, माननीय मुख्यमंत्री श्री. Devendra Fadnavis जी यांच्या संकल्पनेतून व माननीय उपमुख्यमंत्री श्री. Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे जी यांच्या मार्गदर्शनाखाली, एस.आर.ए. बृहन्मुंबईच्या पुढाकाराने आयोजित “समक्ष जागेवर समस्या निराकरण शिबिर” आज पंतनगर येथील शिवाजी टेक्निकल शाळा हॉलमध्ये यशस्वीरीत्या संपन्न झाले.या शिबिरात मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांच्या बायोमेट्रिक समस्या, पात्रतेसंदर्भातील तक्रारी, प्रलंबित भाडे प्रकरणे, सदनिका वाटप, वारसपत्र कार्यवाही आणि पुनर्वसन योजनांबाबतच्या विविध प्रश्नांवर प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत तत्काळ कार्यवाही करण्यात आली.या प्रसंगी नगरसेविका राखीताई जाधव, नगरसेवक धर्मेश गिरी, नगरसेवक सुरेश आवळे, माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, भावेश भानुशाली, विकास कामत, रत्नम देवेंद्र, मुकुंद काकड, तुषार कांबळे, सचिन भोसले, संघदीप केदारे, कुणाल रत्नम, अनुज शाह, सागर वाघमारे तसेच महिला पदाधिकारी अर्पिता शेलार, अनिता अतितकर, विना लाड, अनु खत्री, गीता जाधव व प्रीती उपाध्याय उपस्थित होते. तसेच प्राधिकरणाचे सचिव श्री. दत्तू नवले, सक्षम प्राधिकरण अधिकारी श्री. मोहन नळदकर, श्रीमती स्नेहा उबाळे आणि तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे व श्रीधर गालिपीली आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून नागरिकांचे प्रश्न जागेवरच सोडवले. अनेक वर्षांपासून रखडलेल्या क्लिष्ट प्रश्नांना थेट मार्ग मिळाल्यामुळे उपस्थित लाभार्थी नागरिकांनी अत्यंत समाधान व्यक्त केले.घाटकोपरमधील प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर आणि न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.


















