घाटकोपर पूर्व: अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, उड्डाणपूल व नीलयोग वेदांत प्रश्नांवर संयुक्त बैठक

Posted by admin
Category:

घाटकोपरच्या पायाभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्नांवर सकारात्मक बैठक!

जनसंपर्कआज माझ्या घाटकोपर पूर्व विधानसभा क्षेत्रात, माझ्या अध्यक्षतेखाली घाटकोपर भाजपा जनसंपर्क कार्यालयात एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. अंधेरी-घाटकोपर लिंक रोड व उड्डाणपुलाच्या सुरू असलेल्या कामांना गती मिळावी, तसेच नीलयोग वेदांत इमारतीतील रहिवाशांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.या बैठकीस नगरसेवक श्री. धर्मेश गिरी जी, नगरसेविका श्रीमती राखीताई जाधव, मुंबई महानगरपालिका पूल विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. हरीश कोराटे जी, महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (MRIDC) अतिरिक्त व्यवस्थापक श्रीकांत जी, तसेच नीलयोग वेदांत सोसायटीचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीदरम्यान नागरिकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रत्येक शंकेचे समाधानकारक व सकारात्मक निरसन करण्यात आले, तसेच प्रलंबित बाबींविषयी आवश्यक माहिती घेण्यात आली. यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत!

Leave a Reply

Open chat
Powered by