अनधिकृत फेरीवाला मुक्त मुंबई: ‘N’ विभागात QR Code युक्त अधिकृत परवान्यांचे वाटप
27
Jun
मुंबई शहर अनधिकृत फेरीवाल्यांच्या विळख्यातून मुक्त करून, मुंबईकरांसाठी रस्ते आणि पदपथ अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि पादचारीस्नेही बनवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने एक विशेष आणि धडाकेबाज मोहीम हाती घेतली आहे.या क्रांतिकारक उपक्रमांतर्गत ‘स्ट्रीट वेंडर्स ॲक्ट’नुसार मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागातील अधिकृत व पात्र फेरीवाल्यांना अत्याधुनिक ‘QR Code’ युक्त अधिकृत Licence-cum-Identity Card चे वाटप करण्यात आले. या डिजिटल ओळखपत्रांमुळे आता अधिकृत फेरीवाल्यांची ओळख स्पष्ट होणार असून, संपूर्ण फेरीवाला व्यवस्थेत पारदर्शकता, शिस्त आणि नागरिककेंद्रित सुशासन येईल.यावेळी मुंबईच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे, नगरसेवक श्री धर्मेश गिरी, एन विभागातील कर्मचारी तसेच फेरीवाले मोठ्या संख्येने उपस्थित होते.









