घाटकोपर: हिंदू उत्सव समिती आयोजित भव्य ‘श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव २०२६’

Posted by admin
Category:

घाटकोपर नगरीत अवतरली पुरीची भक्ती… महाप्रभू श्री जगन्नाथ रथयात्रेचा अपूर्व सोहळा! आज घाटकोपर रेल्वे स्टेशन (पूर्व) जवळील नीलयोग स्क्वेअर येथे हिंदू उत्सव समिती आयोजित ‘श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव २०२६’ च्या पवित्र सोहळ्यात उपस्थित राहून महाप्रभूंचे आशीर्वाद घेतले. यावेळी माझ्यासह मुंबईच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे, नगरसेविका राखीताई जाधव, भाजपा मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, नगरसेवक धर्मेश गिरी, मा. नगरसेवक भालचंद्र शिरसाट, नगरसेविका अर्चना भालेराव, नगरसेविका व प्रभाग समिती अध्यक्षा अश्विनी मते, नगरसेविका निर्मिती कानडे तसेच इट पदाधिकारी व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. रथयात्रा हा केवळ एक धार्मिक उत्सव नाही, तर तो आपल्या समाजातील सामाजिक सलोखा, एकता आणि एकत्र येण्याच्या शक्तीचे प्रतीक आहे. आज जेव्हा हजारो हात मिळून महाप्रभूंचा रथ ओढत होते, तेव्हा समाजातील एकतेचे एक सुंदर दर्शन घडले. जनसेवेचे कार्य करत असताना अशा अध्यात्मिक सोहळ्यांमधून काम करण्याची एक नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते.हा भक्तीचा अनुपम सोहळा यशस्वी करणाऱ्या समितीचे समन्वयक श्री. कुलीन मनियार जी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे तसेच या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिस्तीचे दर्शन घडवणाऱ्या सर्व लाडक्या घाटकोपरकर भाविक बंधू-भगिनींचे मनापासून आभार! महाप्रभूंचा वरदहस्त आपल्या सर्वांवर सदैव असाच राहो.

Leave a Reply

Open chat
Powered by