११ फुटी रुद्राक्ष शिवलिंगाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यास पावन भेट
23
Aug
॥ हर हर महादेव ॥
चेंबूर येथील श्री भुलिगेश्वर देवालय ट्रस्टच्या प्रांगणात साडेसहा लाख रुद्राक्षांपासून साकारण्यात आलेल्या भव्य ११ फुटी रुद्राक्ष शिवलिंगाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यास भेट देऊन भगवान शिवशंकराचे मनोभावे दर्शन घेतले.या अतिशय पवित्र प्रसंगी उज्जैन येथील मांगलधाम आश्रमाचे पिठाधीश्वर पूज्य श्री महंत राजेंद्र गिरी बापूजी यांचे दर्शन घेऊन शुभ आशीर्वाद प्राप्त केले. रुद्राक्षमय शिवलिंगाचे हे दिव्य दर्शन आणि मंदिरातील भक्तिमय वातावरण अत्यंत मंगलमय व आध्यात्मिक अनुभूती देणारे ठरले.सर्व शिवभक्तांवर भगवान महादेवाची कृपा सदैव राहो, हीच प्रार्थना!








