घाटकोपर पूर्व येथील विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीचा जल्लोष!
4
Nov
दिनांक 03 नोव्हेंबर 2025 रोजी कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाई मंदिर समिती तर्फे राजाराम बने मार्ग, लक्ष्मीबाग, घाटकोपर पूर्व येथील विठ्ठल मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कार्तिकी एकादशी उत्सव सोहळ्यास उपस्थित राहिलो. तसेच, विठ्ठल रखुमाईचे मनोभावे दर्शन घेऊन यथासांग पूजासंवाद साधला.या सोहळ्यात श्री शिव हनुमान भजन मंडळाने सदर केलेल्या सुंदर अभंगांनी वातावरण भक्तिमय केले होते.याप्रसंगी माझ्यासह माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, वॉर्ड अध्यक्ष सचिन भोसले, महिला अध्यक्षा श्रीमती गीताताई जाधव तसेच सन्माननीय आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







