मुंबईतील भाजप आमदारांची मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्यासोबत बैठक
मुंबई विभागातील भाजपा आमदारांची रणनीती बैठक
राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी, भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण जी व भाजपा मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार जी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विभागातील सर्व भाजपा आमदारांची एकत्रित बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत आगामी काळातील पक्षाची दिशा, विकासाचे मुद्दे, मतदारसंघातील प्रलंबित कामे व जनतेशी थेट संवाद वाढवण्याबाबत विस्तृत चर्चा झाली.
या बैठकीत आमदार म्हणून माझ्या घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे प्रस्ताव आणि प्रलंबित प्रश्न मांडण्यात आले. मुंबईच्या भल्यासाठी भाजपा नेहमीच एकसंघ राहून काम करत आली आहे आणि भविष्यातही विकास हा आमचा केंद्रबिंदू राहील.
Strategic Meeting of BJP MLAs from Mumbai Division
A strategic meeting of all BJP MLAs from the Mumbai division was held in Mumbai in the esteemed presence of Hon’ble Chief Minister Shri Devendra Fadnavis Ji, BJP Maharashtra State President Shri Ravindra Chavan Ji, and BJP Mumbai President Adv. Ashish Shelar Ji.
The meeting focused on discussing the party’s roadmap for the upcoming period, key development issues, pending works in various constituencies, and strengthening direct communication with the public.
As the MLA of Ghatkopar East Assembly Constituency, I presented several development proposals and raised various pending issues concerning my constituency. The BJP has always worked in unity for the betterment of Mumbai, and as we move forward, development will continue to remain at the core of our mission.





