घाटकोपर पूर्वमध्ये विद्यार्थ्यांसाठी सलग दुसऱ्या दिवशी मोफत उत्पन्न व डोमिसाईल दाखला शिबीर

Posted by admin
Category:

घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांना कॉलेज प्रवेशाच्या प्रक्रियेत आवश्यक असलेल्या उत्पन्न प्रमाणपत्र व डोमिसाईल (स्थायिकतेचा) दाखला सहज आणि विनामूल्य मिळावा, यासाठी माझ्या विशेष पुढाकाराने सलग २ दिवस मोफत दाखला शिबीर आयोजित करण्यात आले असून या शिबिरामध्ये स्थानिक शालेय विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक टप्प्यात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची सोपी प्रक्रिया पूर्ण करून शासनमान्य दाखले दिले जातील.
🗓 तारीख: 16 मे 2025 (शुक्रवार)
🕙 वेळ: सकाळी 10.00 ते सायं 5.00 वाजेपर्यंत
📍 स्थळ: साईलीला हॉल, राजावाडी पोस्ट मार्टम सेंटर समोर, राजावाडी हॉस्पिटल, घाटकोपर (पूर्व)
शिबिरात आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्गदर्शन करण्यासाठी अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची स्वतंत्र टीम उपलब्ध आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, आणि वेळेत येऊन आवश्यक दाखले प्राप्त करावेत.

Leave a Reply

Open chat
Powered by