स्वातंत्र्य दिनानिमित्त पुणे विद्यार्थी गृह येथे भव्य ध्वजारोहण सोहळा
15
Aug
भारत माता की जय
घाटकोपर पूर्व, नाथ पै नगर येथील सुप्रसिद्ध पुणे विद्यार्थी गृह येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहून तिरंग्याला मानवंदना दिली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बोराटे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.देशभक्तीच्या उत्साहाने भारलेल्या वातावरणात विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम आणि एकतेचा संदेश दिला. उपस्थित सर्वांनी देशाच्या प्रगतीसाठी व विकसित भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय हिंद! जय भारत!










