‘सुदर्शन सेवा संघ’ आयोजित ‘अष्टप्रहरी’ नामजप महायज्ञात उपस्थिती व दर्शन
1
Jun
घाटकोपर काल दिनांक ३१ मे २०२६ रोजी ‘सुदर्शन सेवा संघ’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या अत्यंत पवित्र आणि मंगलमयी ‘अष्टप्रहरी’ (नामजप महायज्ञ) सोहळ्याला उपस्थित राहून विठ्ठल-कृष्णाच्या चरणी नतमस्तक होता आले. अखंड हरी नामाच्या गजराने संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध आणि चैतन्यमय झाला होता.या प्रसंगी माझ्यासोबत महापौर श्रीमती रितूताई तावडे, नगरसेवक श्री. धर्मेश गिरी जी, नगरसेविका राखीताई जाधव यांच्यासह सुदर्शन सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य विठ्ठल-कृष्ण भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.






