मोरारी बापूंच्या उपस्थितीत श्रीरामकथेचा भव्य सोहळा!

Posted by admin
Category:

जय सिया राम!घाटकोपरची पावन-भूमी आज भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जेने उजळून निघाली. परम पूज्य मोरारी बापूंच्या अमृतमय उपस्थितीत श्रीरामकथेचा भव्य आणि मंगल प्रारंभ झाला.या शुभप्रसंगी महाग्रंथ श्रीरामचरित मानसाच्या पवित्र पोथीची दिव्य मिरवणूक काढण्यात आली. शंखनाद, जयघोष, ढोल-ताशे, रोषणाई आणि रामनामाच्या अखंड जपात पोथीचे स्वागत होताच संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. चित्रकूट धाम- आचार्य अत्रे मैदान, पंत नगर येथे झालेला हा प्रारंभिक सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीने अविस्मरणीय ठरला. सर्वत्र फुलांचे रांगोळीने सजलेले मार्ग, रामसंगीताने भारलेले वातावरण आणि प्रत्येकाच्या ओठांवर ‘जय श्रीराम’ हा जयघोष.., जणू काही अयोध्यानगरी आज घाटकोपरमध्ये अवतरली होती.रामकथेचा श्री-गणेशा… प्रारंभीच्या प्रवचनात पूज्य बापूंनी रामकथेचा उद्देश किती व्यापक आणि मानवकल्याणकारी आहे याचे अत्यंत हृदयस्पर्शी विवेचन केले. रामकथा ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर मानवी मूल्यांना दिशा देणारी जीवनशैली आहे, हे त्यांनी शब्दांतून आणि अनुभूतीतून भाविकांच्या अंतरात रूजवले.या वर्षीच्या रामकथेचा प्रमुख संकल्प- ‘मानवसेवा हीच रामसेवा’ या संकल्पाशी निष्ठा दाखवित, दोन महत्त्वाच्या सेवायोजना सार्वजनिक जाहीर करण्यात आल्या •‘सदभावना वृद्धाश्रम’निराधार, असहाय आणि आजारी मातांचा आजन्म विनामूल्य सांभाळ करणारी ही संस्था मानवतेचा खरा आश्रयस्थळ ठरणार आहे. येथे प्रेम, सन्मान आणि सेवा हीच खरी संपत्ती असेल.•‘सुपर स्पेशालिटी रुग्णालय’- राष्ट्रसंत पूज्यनिय नम्रमुनी महाराज यांच्या प्रेरणेनेया रुग्णालयाचा मुख्य उद्देश- आर्थिक दुर्बल, गरजू आणि वृद्ध रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा विनामूल्य किंवा अत्यल्प दरात उपलब्ध करून देणे.ही घोषणा जाहीर होताच संपूर्ण सभामंडप भावनांनी आणि टाळ्यांच्या गजराने भरून गेला.रामनामाचा महिमा, सेवाधर्माची ओळख आणि अध्यात्मिक मूल्यांचे तेज या सर्वांचा उदात्त संगम म्हणजे घाटकोपरमध्ये सुरू झालेली ही ‘श्रीरामकथा’ होय. भक्तांच्या हृदयात तेवलेला रामभक्तीचा हा दिवा आता प्रेम, श्रद्धा आणि मानवतेच्या प्रकाशाने सदैव उजळत राहील.जय श्रीराम, जय जय श्रीराम..!

Leave a Reply

Open chat
Powered by