माता रमाबाई आंबेडकर नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिलो
उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे!
भारतरत्न, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त घाटकोपर पूर्व येथील माता रमाबाई आंबेडकर नगर येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले. या प्रसंगी त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना केली.
सदर कार्यक्रमामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठीचे योगदान, त्यांचे विचार आणि सामाजिक न्यायासाठी लढा यावर प्रकाश टाकत उपस्थितांना प्रेरणा दिली. “डॉ. आंबेडकरांचे कार्य हे आजच्या पिढीसाठी एक मार्गदर्शक ठरत आहे आणि त्यांचे विचार अंगीकारूनच समाजात खरे परिवर्तन घडवता येईल”, असे यावेळी सांगितले.
या अभिवादन सोहळ्यात परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, समाजसेवक, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडले.