घाटकोपर विकासकामांसाठी मनपा उपायुक्तांशी सविस्तर बैठक

Posted by admin
Category:

घाटकोपरसाठी कटिबद्ध – विकासासाठी न थांबणारा प्रवास..!
दिनांक २८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता ‘मनपा एन विभाग’ येथे उपायुक्त परिमंडळ ६ सोबत सविस्तर बैठक पार पडली.
या बैठकीत घाटकोपर (पूर्व-पश्चिम) व विद्याविहार परिसरातील नागरिकांच्या विविध प्रलंबित आणि महत्त्वाच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. विकासकामांची प्रगती, दुरुस्ती व अंमलबजावणीसाठी जबाबदार अधिकाऱ्यांकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली.
सदर बैठकीतील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे:

  • विद्याविहार येथे सुरु असलेल्या पूर्व-पश्चिम रेल्वे उड्डाणपुलाच्या विलंबासंदर्भात चर्चा.
  • गारोडिया नगरमधील ५ रस्त्यांचे डांबरीकरण त्वरीत पूर्ण करण्याची मागणी.
  • घाटकोपर पूर्व व विद्याविहार पश्चिम येथील स्काय वॉकच्या दुरुस्तीबाबत निर्णय.
  • एल.बी.एस मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्याचे नियोजन.
  • श्रद्धानंद रोड झुनझुनवाला कॉलेजच्या पुढे रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झोपड्यांचे पुनर्वसन.
  • पंतनगर म्हाडा परिसरातील मल:निस्सारण वाहिनी वृद्धिकरण.
  • गौरीशंकर वाडीतील नाट्यगृहासंदर्भात कार्यवाही.
  • नित्यानंद नगर येथील ५६ आसनी शौचालयाची दुरुस्ती/पुनर्बांधणी.
  • माता रमाबाई नगर येथील राखीव भूखंडावर सुसज्ज मनपा रुग्णालयाच्या उभारणीसंदर्भात चर्चा.
  • कामराज नगर येथील हिंदू स्मशानभूमीतील सुविधांचा आढावा.
  • कॅश्युरीना सोसायटी जवळील मोकळ्या भूखंडावरील अतिक्रमणाबाबत त्वरित कारवाई.
  • घाटकोपर पश्चिम मिलन शॉपिंग सेंटर येथील धोकादायक इमारतीतील बाल्कनी निष्कासन.
  • राजावाडी येथील प्रमोद महाजन उद्यानाच्या देखभाल व दुरुस्ती.
  • घाटकोपर परिसरातील वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येवर नियंत्रण.
    या सर्व प्रलंबित कामांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. जनतेच्या सहकार्याने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याने प्रत्येक समस्या सोडवण्याचा आमचा संकल्प दृढ आहे.

Leave a Reply

Open chat
Powered by