घाटकोपर पोलिस वसाहतीतील पाणी समस्या: सकारात्मक तोडग्यासाठी प्रशासनाशी चर्चा

Posted by admin
Category:

घाटकोपर पूर्व येथील पंतनगर मधील पोलीस वसाहतीतील 13 इमारतींना सतत होतं असलेल्या अस्वच्छ पाण्याच्या पुरवठ्याबाबत विविध स्तरावर प्रश्न उपस्थित करून नागरिकांना स्वच्छ पाणी तातडीने मिळण्याबाबत मी पाठपुरावा करत आहे.
याच अनुषंगाने काल म्हाडा, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच पोलीस विभागातील अधिकारी वर्गाशी याबाबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेत स्थानिक नागरिक व श्री अजय बागल देखील सहभागी झाले. पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणे, डागडुजी करणे आदी आवश्यक गोष्टी करण्यात याव्यात यासाठी संबधित अधिकारी वर्गाकडे मी आग्रह धरला असून यावर लवकरच सकारात्मक तोडगा निघेल.

Leave a Reply

Open chat
Powered by