घाटकोपर पूर्व येथे माता रमाबाई आंबेडकर नगर उड्डाणपूल आणि सबवेच्या लोकार्पण सोहळ्यात सहभागी होण्याचा मान मिळाला
26
Apr
आज घाटकोपर पूर्व येथे मुंबई भाजपा अध्यक्ष व राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी, माजी खासदार मा. श्री. मनोज कोटक जी यांच्यासमवेत माता रमाबाई आंबेडकर नगर उड्डाणपूल आणि सबवेच्या लोकार्पण सोहळ्यात सहभागी होण्याचा सन्मान मिळाला. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केले.
या सोहळ्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश मेहता, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष दीपक दळवी, भालचंद्र शिरसाट, विनायक कामत, विकास कामत, रवी पुज, बिंदू त्रिवेदी, रितु तावडे, भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.