घाटकोपर पूर्व येथे तामिळ भक्तांनी परंपरेनुसार अनवाणी पायी देवी मंदिरात प्रवेश करणाऱ्यांचे पुष्पवर्षावाने स्वागत केले
15
Apr
घाटकोपर पूर्व येथील तामिळ समुदायातील श्री देवी मुत्तुमारीअम्मा भक्तांनी प्रथा-परंपरेप्रमाणे शरीरात त्रिशूळ खुपसून, महिला भक्तांनी दुधाचा शक्ती कलश हाती घेऊन श्री गणेश मंदिर मार्गे, अरुण वैद्य मैदान, पंतनगर येथून कामराज नगर येथील मंदिरातील अग्नीकुंडातुन अनवाणी पायी चालत श्री देवी मुत्तुमारीअम्मा मंदिरात प्रवेश केला.
या प्रवेश प्रसंगी मी या भक्तगणांवर पुष्प-वर्षाव करून त्यांचे मनोभावे स्वागत केले.