“घाटकोपर (पूर्व) मतदारसंघातील म्हाडा संदर्भातील विविध विषयांवर म्हाडाचे उपाध्यक्ष श्री संजीव जैस्वाल यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली “

Posted by admin
Category:

आज दिनांक ८ मे २०२५ रोजी घाटकोपर पूर्व मतदारसंघातील ‘म्हाडा’ संदर्भातील विविध विषयांबाबत म्हाडाचे उपाध्यक्ष श्री संजीव जैस्वाल यांच्या दालनात सविस्तर चर्चा केली.
श्री संजीव जैस्वाल यांनी या सर्व विषयाबाबत सकारात्मक निर्णय घेवून अधिकारी वर्गास तातडीने अहवाल सादर करण्याची सूचना केली. या बैठकीस माझ्यासोबत मा. नगरसेवक श्री भालचंद्र शिरसाट, श्री विकास कामत, श्री रवी पूज, श्री अजय बागल, श्री भावेश भानुशाली आदी पदाधिकारी आणि रहिवाशी उपस्थित होते.
सदर बैठकीत खालील विषयांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली.
१) राजावाडी चित्तरंजन नगर येथील म्हाडा आर.जी. प्लॉटवरील अतिक्रमण निष्कासनाबाबत कुर्ला विभाग अधिकाऱ्यांची निष्क्रियता
२) म्हाडा चित्तरंजन नगर राजावाडी येथील रस्त्यावरील अतिक्रमण
३) पंतनगर म्हाडा लेआउट मधील नवीन मलनिस्सारण वाहिनीचे जाळे (Augmentation of Sewer network)
४) पंतनगर येथील म्हाडा वसाहतीतील काही रस्ते अद्याप महापालिकेला हस्तांतरित केलेले नाहीत याबाबत कार्यवाही करणे बाबत
५) पंतनगर म्हाडा लेआउट मधील सर्व रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण
६) मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या घाटकोपर पूर्व, लक्ष्मी नगर येथील ट्रांजिस्ट कॅप बिल्डिंग क्रमांक तीन अ व ब मधील थकीत जलदेयकाबाबत
७) लक्ष्मी नगर येथील ट्रांजिस्ट कॅप बिल्डिंग क्रमांक तीन अ व ब इमारतीच्या दुरुस्ती व देखभाली बाबत
८) पंतनगर येथील पुनर्विकासासाठी निष्कर्षित केलेल्या आणि तदनंतर विकासकामुळे पुनर्विकास रखडलेल्या इमारतींच्या बाबत उदाहरणार्थ इमारत क्रमांक १६ व २५ व अर्धवट पुनर्विकास झालेल्या व भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारत क्र ४,५,६,१३,१०५ बाबत ठोस निर्णय घेणेबाबत
९) मेडिकल प्लॉट क्रमांक २७२- हॉस्पिटल प्लॉट – सदरचा प्लॉट हा वैद्यकीय कामासाठी आरक्षित असून गेल्या ४० वर्षापासून तसाच पडून आहे. सदर प्लॉट एखादया संस्थेला देण्यात यावा अथवा महापालिकेला हस्तांतरीत करण्यात यावा
१०) पंतनगर पोलिस स्टेशन समोरील प्लॉट सीटीएस १९० ही जागा गृह खात्यास वर्ग केलेली आहे. ३००० स्क्वे.मी. चे पोलीस स्टेशन व पोलीस वसाहत, १०००० स्क्वे.मी. पोलीस अतिरिक्त आयुक्त कार्यालय व उर्वरित जागा पेट्रोल पंपाकरिता आरक्षित आहे.या भूखंडाचा विकास करणेबाबत
११) पंतनगर पोस्ट ऑफिसचा पुनर्विकास- सदरचे पोस्ट ऑफीस हे १९६० साली २ खोल्यांचे असून प्लॉट एरीया ४०० स्क्वे. मी आहे
१२) समाज मंदिर हॉल पंतनगर भाडेकरू संघाला हस्तांतरित करावा. अथवा NGO संस्थेस प्रचालन, देखभाल व दुरुस्ती साठी हस्तांतरित करावा.
१३) रेशनिंग ऑफिसचे हस्तांतरण- सदरचे कार्यालयाची जागा पूर्ण बांधलेली असून शिधा वाटप कार्यालय स्थलांतरीत करावयाचे आहे. शिधा नियंत्रकाकडे बैठका घेऊन म्हाडानी प्रक्रिया पूर्ण करावी
१४) पंतनगर पोलीस वसाहत : पंतनगर मधील १३ पोलीस इमारतींचा पुनर्विकास
१५) १३ पोलिस इमारतींसाठी स्वतंत्र पाण्याची लाइन- १३ इमारतींसाठी पाण्याची वेगळी लाईन करण्यात यावी जेणेकरून वारंवार होणाऱ्या घाण पाण्याचा पोलीस कर्मचाऱ्यांचा त्रास मिटेल
१६) माझ्या विधानसभेमध्ये म्हाडा जागेमध्ये बनलेल्या SRA इमारतींच्या लीज ॲग्रीमेंट होण्याबाबत.
१७) चित्तरंजन नगर डी कॉलनी येथील ३०० चौ.स्क्वे.मी. ची जागेचा लीज ॲग्रीमेंट गेल्या ५ वर्षापासून रखडलेले आहे ते तातडीने होण्याबाबत.
या सर्व विषयावर सकारात्मक चर्चा झाली.

Leave a Reply

Open chat
Powered by