घाटकोपर पूर्वमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत उत्पन्न व डोमिसाईल दाखला शिबीर आयोजित

Posted by admin
Category:

घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांना कॉलेज प्रवेशाच्या प्रक्रियेत आवश्यक असलेल्या उत्पन्न प्रमाणपत्र व डोमिसाईल (स्थायिकतेचा) दाखला सहज आणि विनामूल्य मिळावा, यासाठी माझ्या विशेष पुढाकाराने मोफत दाखला शिबीर आयोजित करण्यात आला आहे.
🗓 तारीख: 15 मे 2025 (बुधवार)
🕙 वेळ: सकाळी 10.00 ते सायं 5.00 वाजेपर्यंत
📍 स्थळ: माता रमाबाई नगर, गंध कुटी बुद्ध विहार, घाटकोपर (पूर्व)
या शिबिरामध्ये स्थानिक शालेय विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक टप्प्यात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची सोपी प्रक्रिया पूर्ण करून शासनमान्य दाखले दिले जातील. शिबिरात आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्गदर्शन करण्यासाठी अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची स्वतंत्र टीम उपलब्ध आहे.
तसेच, उद्या दिनांक १६ मे २०२५ रोजी साईलीला हॉल, राजावाडी पोस्ट मार्टम सेंटर समोर, राजावाडी हॉस्पिटल, घाटकोपर (पूर्व) येथे मोफत दाखला शिबीराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, आणि वेळेत येऊन आवश्यक दाखले प्राप्त करावेत.

Leave a Reply

Open chat
Powered by