कार्यकर्त्यांभाजपा ईशान्य मुंबईच्या श्रम परिहार कार्यक्रमात उत्साहपूर्ण सहभागच्या परिश्रमाला सलाम, विजयाचा गौरव सोहळा!

Posted by admin
Category:

भाजपा ईशान्य मुंबई च्या वतीने आयोजित केलेल्या श्रम परिहार कार्यक्रमास उपस्थित राहिलो. यावेळी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला जे यश मिळाले त्या यशात सहभागी असलेल्या सर्व बूथ प्रमुख,शक्ती केंद्रप्रमुख, पदाधिकारी, आमदार, नगरसेवक व सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास माझ्यासह भाजपा नेते, माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या जी, मा. खासदार श्री. मनोज कोटक जी, आमदार श्री. मिहीर कोटेचा जी, भाजपा ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री दीपक दळवी जी, नवनिर्वाचित नगरसेविका सौ. राखीताई जाधव, सौ. रितू राजेश तावडे जी, श्री. धर्मेश गिरी जी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महानगरपालिका निवडणुकीत मिशन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ध्येय नजरेसमोर ठेवून प्राणपणाने लढणाऱ्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक आणि मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Open chat
Powered by