कामराज नगर येथील श्री देवी मुत्तुमारीअम्मा मंदिराचा वार्षिक महोत्सव २०२५ येथे उपस्थित राहिलो
घाटकोपर पूर्वे येथील कामराज नगर येथील श्रद्धास्थान असलेल्या ‘श्री देवी मुत्तुमारीअम्मा मंदिराचा वार्षिक महोत्सव व वर्षाभिषेक २०२५’ उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. या पवित्र उत्सवामध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत, देवीचे दर्शन घेतले आणि धार्मिक विधींमध्ये भाग घेतला.
या विशेष दिवशी, मंदिराला भेट देऊन देवीच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. माझ्या मनोगतातून देवी भक्तांच्या सेवेसाठी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले तसेच, मंदिराच्या कामकाजाबद्दल कौतुक व्यक्त करत, अशा धार्मिक स्थळांमुळे सामाजिक एकात्मता आणि संस्कृतीची जपणूक होत असल्याचे मी नमूद केले.
या उत्सवात विशेष पूजा, होमहवन, पालखी मिरवणूक आणि भजन संध्या यासारख्या अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भरलेले होते.
श्री देवी मुत्तुमारीअम्मा मंदिराचा हा वार्षिक महोत्सव भक्तांसाठी आध्यात्मिक उर्जा देणारा ठरला आणि परिसरात एकतेचा, श्रद्धेचा आणि सौहार्दाचा संदेश देत यशस्वीरीत्या पार पडला.