आयटी झोन प्रकल्पांचा पाहणी दौरा: विधानसभा आश्वासन समितीने घेतला प्रत्यक्ष आढावा
विधानसभा आश्वासन समिती- मुंबई आयटी प्रकल्प पाहणी दौरा
🗓️ दिनांक: ३० जुलै २०२५
जनतेच्या हितासाठी आणि शासकीय योजना योग्य प्रकारे अमलात याव्यात यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
आज विधानसभा आश्वासन समितीच्या सदस्य म्हणून मुंबईतील विविध आयटी प्रकल्पांचे प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. सकाळी विधान भवनात एकत्र जमून समितीने मुंबईतील आयटी झोनसाठी मंजूर असलेल्या परंतु प्रत्यक्षात कमी आयटी वापर केलेल्या प्रकल्पांना भेट दिली. या ठिकाणी मफतलाल मिल, पिरामल मिल, गीता टॉकीज, श्रीनिवास मिल, कमला मिल, सिनर्जी आयटी पार्क आणि मोतीलाल ओस्वाल फायनांशियल सर्व्हिसेस या ठिकाणांचा समावेश होता.
या भेटीदरम्यान आयटी क्षेत्रासाठी मंजूर जागेचा प्रत्यक्ष वापर, सद्यस्थिती आणि धोरणात्मक अंमलबजावणी याचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. या प्रकल्पांमध्ये आयटीचा वापर अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले असून, भविष्यातील धोरणे आखताना ही निरीक्षणे महत्त्वाची ठरणार आहेत.
दुपारी मुंबईतील डॉन मिल, ज्युपिटर मिल, अपोलो मिल आणि एल्फिन्स्टन मिल या प्रकल्पांनाही भेटी दिल्या. या ठिकाणी देखील मंजूर क्षेत्राचा योग्य वापर होतोय का, याचा अभ्यास समितीने केला.
📝 या पाहणी दौऱ्यामुळे प्रत्यक्ष भौगोलिक, तांत्रिक व प्रशासकीय बाबी समजून घेता आल्या आणि भविष्यातील निर्णयप्रक्रियेला दिशा मिळणार आहे.











