शिवतीर्थावर महायुतीचा विराट शक्तिप्रदर्शन सोहळा! जनसागराच्या साक्षीने विकास आणि मराठी अस्मितेचा निर्धार
आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथील भाजपा– शिवसेना– आर पी आय महायुतीच्या भव्य प्रचार सभेत उपस्थित माझ्या घाटकोपर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार, नागरिकांसह उपस्थित राहिलो. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून विराट जनसागर आज शिवतीर्थावर उपस्थित होता.कार्यकर्त्यांच्या जल्लोषात, जयघोषाने अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झालेल्या या महाप्रचंड सभेत मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस जी यांनी ठाकरे बंधूंच्या मराठी मुद्द्याला घणाघाती प्रत्युत्तर देत मुंबई ही मराठी माणसांची आणि महाराष्ट्राचीच आहे, हे ठणकावून सांगितले आणि ठाकरे बंधूंचा खोट्या मराठी प्रेमाचा बुरखा त्यांनी फाडून टाकला.यावेळी मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे जी यांनी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करता येणार नाही, असे ठामपणे सांगत ठाकरे बंधूंच्या भावनिक खेळाला बळी न पडण्याचे आवाहन केले.याप्रसंगी मंचावर केंद्रीय राज्यमंत्री मा श्री रामदास आठवले जी, भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री मा. श्री विनोद तावडे जी, मा. केंद्रीय मंत्री श्री. पियुष गोयल जी, भाजपा ,मुंबई अध्यक्ष मा. श्री. अमीत साटम जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा जी आदी मान्यवरांसह महायुतीचे आजी माजी खासदार, आमदार, अधिकृत उमेदवार, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.









