मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त घाटकोपरमध्ये भव्य रक्तदान शिबीर

Posted by admin
Category:

क्तदान हेच श्रेष्ठ दान… जीवन वाचविण्याचा महान संकल्प!

भारतीय जनता पार्टी, घाटकोपर पूर्व विधानसभा – वॉर्ड क्र. १२५ यांच्या वतीने, महाराष्ट्राचे लाडके नेते मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर अत्यंत उत्साहात पार पडले.समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत परिसरातील अनेक नागरिक व कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून मानवसेवेचा एक आदर्श वस्तुपाठ वस्तुपाठ घालून दिला. रक्तदान हे अनेक गरजू रुग्णांसाठी जीवनदान ठरत असल्याने या समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.याप्रसंगी रत्नम देवेंद्र, मंडळ अध्यक्षा सौ. अर्पिताताई शेलार, वॉर्ड अध्यक्ष श्री. संघदीप केदारे, श्री. राणाप्रताप सिंग, श्री. कुणाल देवेंद्र, सौ. सविता कापसे, सौ. दीपालीताई शिरसाठ, सौ. प्रिती उपाध्याय, श्री. हरीष बोलार, सौ. रेणुका राऊळ, सौ. मंदा दिघे, सौ. विमल सांगळे, श्री. महेंद्र गायकवाड, श्री. करण मोटे तसेच श्री. संदीप यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.”एक रक्तदान… अनेकांना जीवनदान!” या भावनेतून पार पडलेला हा उपक्रम समाजहितासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला. जनसेवेचा हा संकल्प यशस्वी करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे, डॉक्टरांचे आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

Leave a Reply

Open chat
Powered by