भाजपा जनसंपर्क अभियानांतर्गत घाटकोपरमधील प्रतिष्ठित नागरिकांशी थेट चर्चा

Posted by admin
Category:

भारतीय जनता पार्टीच्या व्यापक जनसंपर्क अभियानांतर्गत तसेच देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी यांच्या यशस्वी १२ वर्षांच्या जनसेवा, सुशासन आणि राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पाचा संदेश जन-जनांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने घाटकोपर येथील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक श्री राज भद्रा, पद्मशी गजरा, श्री समीर पारेख, श्री मंथनभाई, श्री किशोर भद्रा, श्री शैलेश भानुशाली, श्री अंकित भानुशाली, श्री किरण जैन, श्री देवजी भद्रा तसेच श्री प्रदीप सोनवणे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या परिसरातील इतर नागरिकांशी आत्मीय संवाद साधला.यावेळी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गेल्या १२ वर्षांत घेतलेले ऐतिहासिक निर्णय, जनकल्याणकारी योजना, विकासकामे तसेच राष्ट्रहितासाठी केलेले महत्त्वपूर्ण उपक्रमांची सर्वांना सविस्तर माहिती दिली. तसेच समाजहित आणि राष्ट्रहिताच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.या प्रसंगी जिल्हा महामंत्री श्री भावेश भानुशाली, नगरसेवक श्री धर्मेश गिरी, श्री रवी पूज, श्री पियुष दास, मंडळ अध्यक्ष श्री विशाल पूज, मंडळ महामंत्री श्री दिलीप लिलानी तसेच वॉर्ड अध्यक्ष श्री अनुज शाह उपस्थित होते.

Leave a Reply

Open chat
Powered by